कोण म्हणतं फुकटात काही मिळत नाही?विश्वास बसत नाही? तर मला सांगा या सगळ्या गोष्टी फुकटात मिळत नाहीत का?या डिजीटल जगात सगळं काही मिळत. फक्त काय घ्यायचे ते आपण ठरवले पाहिजे.
कोण म्हणतं फुकटात काही मिळत नाही?
या डिजीटल जगात सगळं काही मिळत.... फक्त काय घ्यायचे ते आपण ठरवले पाहिजे.
विश्वास बसत नाही? तर मला सांगा....
1. रोजचा पेपर (वर्तमानपत्र) फुकटात वाचता येतो की नाही?
2. एखादं पुस्तक PDF मध्ये किंवा ऑनलाईन मिळतं नाही का?
3. पैसे न भरता TV वरचे चैनल पाहता येत नाहीत का?
4. ब्रोकरेज न देता घर भाड्याने मिळत नाही का?
5. एजंटला पैसे न देता जॉबची संधी मिळते कि नाही?
6. असा कोणी आहे का? ज्याला गुगल पे वापरून आजपर्यंत एकपण रुपाया मिळाला नाही?
7. लाईट बिल, फोन बिल, पाण्याचं बिल, बँकेचे व्यवहार हे सगळे घर बसल्या केल्यावर पैसे वाचतातच ना?
8. स्वयम: सारख्या व्यासपीठावरून पैसे न देता IIT, IIM मधल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेता येत नाही का?
9. ऑनलाईन फ्रीलान्सिंगमधून घर बसल्या जगातल्या अनेक प्रोजेक्टवरती काम करून पैसे मिळवता येतात कि नाही?
थोडक्यात या डिजिटल जगात असं बरचं काही आहे, पण ‘तिथेपर्यंत पोहोचायचे कसे?’ हे आजच्या पिढीला कळत नाही. मोबाईलमध्ये गेम खेळत बसने, व्हिडीओ पाहत बसने आणि फारच हुशार असेल तर सतत व्हिडीओ तयार करत बसणे. काहीच नाही तर, आलेले कोणतेही मेसेज फोरवर्ड करत बसणं यातच सार्थकता मानणारी संस्कृती तयार होत आहे.
मुळात ‘इंटरनेटचा शोधच का लागला?’ हे बघितलं तर, आपण त्याचा वापर कसा करावा हे लक्षात येईल. सर्वांना मोफत पुस्तक वाचता यावीत या प्रांजळ हेतूने या अलौकिक प्रणालीचा शोध लागला. पण आजकाल याचा वापर वेगळ्याच गोष्टी मोफत मिळवण्यासाठी केला जातोय, हे खरे दुःख!
जसं,
पाण्याच्या धारेला निट वाट करून दिली की शेत पिकतं...
शिष्याला खरी दिशा दाखवणारा गुरु भेटला की, त्याचं जीवन बदलत...
तसचं, या डिजिटल जगात तुम्ही इंटरनेटचा चांगला वापर शिकलात, तर तुमच करियर घडेल!
आम्ही MS-CIT या कोर्समधून थोडंस स्वतःला आणि बरचस समाजाला उपयोगी पडेल असं, या डिजिटल दुनियेच ज्ञान एक कोटिपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना दिले आहे. आमचा विश्वास आहे ती पिढी आज या डिजिटल दुनियेचा सक्षम भाग बनली आहे आणि पुढेही अशा पिढी घडवत राहू...
नव्या पिढीला डिजिटल दुनियेची खरी दिशा दाखवण्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करावी हि विनंती!
नवीन Batch प्रवेश सुरू #MSCIT प्रवेशासाठी अंतिम दिनांक 31 जानेवारी
@
जीनियस कंप्यूटर एज्युकेशन
पोहनेर रोड , सिरसाळा.
- संपर्क -
📱9922754482
📱9404697893
☎02446-262305
Comments
Post a Comment